‘डीकेटीई’चा देश पातळीवर गौरव

By Admin | Updated: June 26, 2015 00:13 IST2015-06-26T00:13:13+5:302015-06-26T00:13:13+5:30

सन २०१४-१५ मध्ये हायर एज्युकेशन रेव्ह्युव या नियतकालिकाने देश पातळीवर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले

DKE's country level pride | ‘डीकेटीई’चा देश पातळीवर गौरव

‘डीकेटीई’चा देश पातळीवर गौरव

इचलकरंजी : येथील डीकेटीई टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचा देश पातळीवरील उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय क्षेत्रात २३वा, तर टॉप २० अकॅडॅमीकल बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजस्मध्ये ११वा क्रमांक मिळाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.पी.व्ही.कडोले यांनी दिली.सन २०१४-१५ मध्ये हायर एज्युकेशन रेव्ह्युव या नियतकालिकाने देश पातळीवर अभियांत्रिकी महाविद्यालयांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधन, सल्लामसलत, प्रकल्प सादरीकरण, प्रवेश, उत्पादकता विकास, औद्योगिक प्रशिक्षण, अंतर्गत सुविधा, सरकारी संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी आणि उद्योगांशी सामंजस्य करार, प्लेसमेंट, आदी प्रकारच्या कामगिरीचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये हे क्रमांक देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, आदींच्या स्थापत्याच्या परिश्रमाने हे यश मिळाले असल्याचेही डॉ. कडोले यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: DKE's country level pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.