‘डीकेएएससी’ ऑनलाइन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:58+5:302021-07-05T04:15:58+5:30
परसबागेबाबत मार्गदर्शन कबनूर : कृषी दिनानिमित्त श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने कापूरवाडी (ता.हातकणंगले) येथील कुटुंबीयांना परसबागेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३५ ...

‘डीकेएएससी’ ऑनलाइन कार्यशाळा
परसबागेबाबत मार्गदर्शन
कबनूर : कृषी दिनानिमित्त श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने कापूरवाडी (ता.हातकणंगले) येथील कुटुंबीयांना परसबागेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३५ कुटुंबीयांना १३ प्रकारच्या भाजीपाला बियांचे वाटप करण्यात आले. यावेळी कापूरवाडीचे उपसरपंच विकास नाईक, भक्ती शिंदे, अमोल माने, आदी उपस्थित होते.
विनायक विद्यालयात वृक्षारोपण
इचलकरंजी : विनायक विद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी बी.बी. भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास सुमन चव्हाण, रवींद्र चव्हाण, किरण कुमार, अशोक हुबळे, आदी उपस्थित होते.
कोविड केंद्रामधील डॉक्टरांचा सन्मान
कबनूर : येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोविड केंद्रामधील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. संघटनेच्यावतीने सर्व डॉक्टरांना गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी सरपंच शोभा पोवार, डॉ. विजय इंगवले, मिलिंद कोले, राजाराम वाकरेकर, महावीर लिगाडे, आदी उपस्थित होते.