शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

प्राथमिक शिक्षकांची पगाराविनाच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:01 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांना पगाराविनाच दिवाळी साजरी करावी लागली. वास्तविक दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचा पगार करण्याचे आदेश सरकारने दिले असताना दिवाळी झाली तरी अद्याप शिक्षकांना पगार न मिळाल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत गेले आहेत. त्याशिवाय इतर कामेही कोलमडल्याने ढिम्म प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षकांची पगाराविनाच दिवाळीढिम्म प्रशासनाचा फटका : कर्ज हप्ते गेले थकीत

कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांना पगाराविनाच दिवाळी साजरी करावी लागली. वास्तविक दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचा पगार करण्याचे आदेश सरकारने दिले असताना दिवाळी झाली तरी अद्याप शिक्षकांना पगार न मिळाल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत गेले आहेत. त्याशिवाय इतर कामेही कोलमडल्याने ढिम्म प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.प्राथमिक शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत करण्याचे आदेश सरकारने दिले. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत जेमतेम तीन महिनेच पगार सुरळीत झाले. त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. २६ आॅक्टोबरपासून दिवाळी सुरू होणार होती, त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तत्पूर्वी म्हणजेच २३ आॅक्टोबरपूर्वी पगार देण्याचे आदेश सरकार दिले होते; पण तोपर्यंत राज्याच्या शालार्थ प्रक्रियेला तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने काम होऊ शकले नाही.

त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि पगाराचे काम ठप्प झाले. दिवाळीच्या सुट्टीनंतर तरी कामाला गती येईल आणि पगार होतील, अशी अपेक्षा शिक्षकांची होती. पण तसे झालेच नाही, दिवाळी संपून तीन आठवडे झाले तरी पगार हातात पडला नाही.साधारणता पगाराची बिले तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर जातात. तिथे संबंधित क्लार्क टिप्पणी करून शिक्षणाधिकाऱ्यांची सही होऊन सामान्य प्रशासन विभागाकडे जातो. तेथून ही बिले कोषागार कार्यालयात जातात. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी होऊन तो धनादेश जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत पाठविला जातो आणि तेथून पगार होतो. हे काम गतीने केले तर फार-फार दोन-तीन दिवस लागतात; पण प्रशासनाची गती मंदावल्याने एकही पगार वेळेत होत नसल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे.प्रत्येक महिन्याला वेगळेच कारणशिक्षकांचे पगार वेळेत व्हावेत, यासाठी संघटनांचा रेटा असतो; पण अधिकारी प्रत्येक महिन्याला वेगळीच कारणे सांगतात. कधी बजेट नाही, मुख्य कार्यकारी अधिकारीच नाहीत, आदी कारणे सांगून वेळ मारून नेण्याचे काम करतात.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळीपूर्वी करण्याचे आदेश देऊनही ते झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेने गतीने काम न केल्याने पगार लांबले आहेत. त्यामुळे कर्जाच्या हप्त्यासह त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.- राजमोहन पाटील,संचालक, प्राथमिक शिक्षक बॅँक 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर