शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांबरोबर दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:55 IST

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांसह शववाहिकेवरील चालक, कर्मचाºयांना नवीन कपडे, फराळ, सेंट, मिठाईचा बॉक्स, आदी साहित्य देऊन

ठळक मुद्देप्रजासत्ताक सामाजिक संस्थेचा उपक्रम फराळ, कपडे, साहित्य देऊन केला सन्मान

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांसह शववाहिकेवरील चालक, कर्मचाºयांना नवीन कपडे, फराळ, सेंट, मिठाईचा बॉक्स, आदी साहित्य देऊन त्यांच्यासोबत कोल्हापूरकरांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला अनोख्या पद्धतीने स्मशानभूमीत दिवाळी साजरी केली. यामुळे या कर्मचाºयांच्या चेहºयावर हास्य उमटले होते. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांच्या प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने हा अनोखा उपक्रम राबविला.

पंचगंगा स्मशानभूमीतील काम करणारे कर्मचारी नेहमीच येथे आल्यानंतर आपुलकी, बंधुभावाची वागणूक देतात. त्यांच्या जीवनात आनंद, उत्साह वाढावा यासाठी गतवर्षापासून प्रजासत्ताक सामाजिक संस्था नरक चतुदर्शीच्या (दीपावली) पूर्वसंध्येला त्यांना दिवाळीचे साहित्य देऊन हा उपक्रम राबविते.

यंदाही पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचारी, शववाहिकेवरील चालक, कर्मचारी यांना चांगल्या पद्धतीचे कपडे, त्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळ, सेंट, मिठाई बॉक्स, सुगंधी तेल, आदी साहित्य देऊन त्यांची दिवाळी साजरी केली.

यावेळी अशोक चंदवाणी, राजू पुरोहित, राजू लिंग्रस, नगरसेवक राजाराम गायकवाड, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जयेश कदम, मानसिंग फडतरे, सचिन पाटील, बुरहान नायकवडी, स्वप्निल भोसले, सुशील कोरडे, सचिन तोडकर, सुभाष देसाई, पाडळीचे महेश पाटील यांच्यासह मित्र उपस्थित होते.खºया अर्थाने हीच माझी दिवाळीयावेळी दिलीप देसाई म्हणाले, आपल्या कुटुंबाचाच एक भाग समजून स्मशानभूमीतील कर्मचाºयांना दिवाळीची भेट म्हणून हे साहित्य दिले. त्यामुळे खºया अर्थाने हीच माझी दिवाळी आहे. या उपक्रमात माझ्याबरोबर माझे मित्र, हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश सूर्यवंशी यांनी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांवर केलेली कविता म्हटली.

टॅग्स :social workerसमाजसेवकdiwaliदिवाळी