शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Diwali : कृष्णात आणि पूजा गहिवरले, सहाध्यायी विद्यार्थ्यांकडून मिळाली दिवाळीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:50 IST

शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता वाचविलेल्या पैशातून कृष्णात आणि पूजा या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी शुक्रवारी नव्या कपड्यांची भेट दिली. दिवाळीला इतर विद्यार्थी नवे कपडे खरेदी करतात, हे ऐकून माहीत असलेल्या या दोघांना या भेटीने अक्षरश: गहिवरून आले.

ठळक मुद्देकृष्णात आणि पूजा गहिवरलेसहाध्यायी विद्यार्थ्यांकडून मिळाली दिवाळीची भेट

संदीप आडनाईककोल्हापूर : शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजवता वाचविलेल्या पैशातून कृष्णात आणि पूजा या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीसाठी शुक्रवारी नव्या कपड्यांची भेट दिली. दिवाळीला इतर विद्यार्थी नवे कपडे खरेदी करतात, हे ऐकून माहीत असलेल्या या दोघांना या भेटीने अक्षरश: गहिवरून आले.मोठ्या लोकांनी वर्गणी जमा करून एखाद्या गरजूला भेट देण्याची अनेक उदाहरणे ऐकली असतील; परंतु शाळकरी मुलांकडूनच आपल्याच शाळेत शिकणाऱ्या सहाध्यायी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना एखादी भेट देण्याचे उदाहरण विरळाच.शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील अधिव्याख्याता नंदकुमार मोरे हे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे साक्षीदार होते.शिवाजी मराठा हायस्कूलचे कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी सहा वर्षांपूर्वी फटाके न वाजवता वाचलेल्या पैशातून एका सहाध्यायी विद्यार्थ्याला आर्थिक सहकार्य करता येईल, अशी संकल्पना मांडली. शाळेतील विद्यार्थ्यांनीही याला पाठिंबा दिला आणि दरवर्षी पहिल्या सत्राच्या समारोपाला विद्यार्थ्यांनीच निवडलेल्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला जमा केलेली मदत देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.खरेतर या शाळेतील बहुतेक विद्यार्थी हे झोपडपट्टीतील रहिवाशी. त्यांची आर्थिक स्थिती जेमतेमच. परंतु अशा परिस्थितीतही आपल्या सहाध्यायी विद्यार्थ्याला दिवाळीला मदत म्हणून कपडे तेही नवीन खरेदी करण्यासाठी जाण्याची त्यांची उर्मी म्हणजे त्यांच्या उच्च विचारांचे दर्शनच घडविते. प्रत्येक विद्यार्थ्याने जसे जमतील तसे थोडेफार पैसे जमा केले. फटाके न वाजविण्याची शपथ तर या विद्यार्थ्यांनी आधीच घेतलेली आहे. आता यातूनही त्यांनी सामाजिक भान जोपासले. या विद्यार्थ्यांचे नंदकुमार मोरे यांनी कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण काटकर व इतर सहकारी यांनीही मदत करून या विद्यार्थ्यांच्या एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या या उपक्रमाला हातभार लावला आहे.पौर्णिमाचे कौतुककोणाला कपडे आणावीत याची चर्चा शिक्षक मुलांबरोबर करत होते, तेव्हा शाळेतील गरजू असणाऱ्या पौर्णिमाचे नाव पुढे आले; परंतु स्वकष्टाचे १०० रुपये घेऊन तीच मदतीला पुढे धावली. पौर्णिमेच्या या मदतीमुळे शिक्षकांना स्वत:मधील खुजेपणा त्यांच्या मनाला धक्का देऊन गेला. खरेतर तिच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते; त्यामुळे यंदा तिच्या घरी दिवाळी होणार नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पौर्णिमेलाच कपडे आणण्याचा विचार मांडला होता. असा विचार मांडणारे विद्यार्थीही झोपडपट्टीतील आहेत, यांना काय संस्कार असणार, असा विचार करणाऱ्यांना हा एक धक्काच म्हणावा लागेल.

एखाद्या कामाची सुरुवात जेव्हा आपण करतो आणि ते काम एका उंचीवर पोहोचते, तेव्हा मोठा मानसिक आनंद मिळतो. फटाके न वाजवता त्याच पैशातून आपल्याच एखाद्या गरजू सहाध्यायी विद्यार्थ्याला दिवाळीची कपडे आणावीत, या कल्पनेत आजही सातत्य राहिले आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. गलेलठ्ठ पगार असणारे लोक पौर्णिमेसारख्या विद्यार्थिनीसमोर खुपच छोटे वाटू लागतात.मिलिंद यादव,कलाशिक्षक, शिवाजी मराठा हायस्कूल

 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीSchoolशाळाkolhapurकोल्हापूर