कोरोनाला हरविण्यासाठी दिव्यांगांनीही कंबर कसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:03+5:302021-05-11T04:24:03+5:30
येथील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संपूर्ण गावात मास्क वाटण्यात आले. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने हात साबणाने स्वच्छ धुवावेत, ...

कोरोनाला हरविण्यासाठी दिव्यांगांनीही कंबर कसली
येथील प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संपूर्ण गावात मास्क वाटण्यात आले. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने हात साबणाने स्वच्छ धुवावेत, सॉनिटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, लहान मुले व वयस्कर व्यक्तींची काळजी घ्यावी, गर्दी करून थांबू नये, आपल्या आरोग्याची सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन संघटनेच्या वतीने केले जात आहे. या उपक्रमात प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पाटील, सुरेश कामेरेकर, शहाजी धनवडे, महादेव पाटील, रणजित अवघडे, रघुनाथ कुंभार, स्वप्निल माने, वैभव जाधव, सखाराम कमलाकर, सुनील पाटील, अनिल नगरे, आदी सहभागी झाले.
१० भादोले
भादोले येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने कोरोना जनजागृती केली जात आहे.