शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 16:57 IST

स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देदिव्यांग थांगराजा यांची दुचाकीवरून भारत परिक्रमाकन्याकुमारीपासून केला १६०० किलोमीटरचा प्रवास

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वामी विवेकानंद यांचा विचार आणि संदेश देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी येथील आर. थांगराजा या दिव्यांग व्यक्तीने दुचाकीवरून ‘भारत परिक्रमा’ सुरू केली आहे. कन्याकुमारीपासून १६०० किलोमीटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात आलेल्या आर. थांगराजा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारकाच्या सप्टेंबर २०१९ ते २०२० या काळात साजऱ्या होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आर. थांगराजा यांनी ‘विश्वबंधुत्व दिवसा’च्या औचित्याने ११ सप्टेंबर रोजी या परिक्रमेस कन्याकुमारी येथून प्रारंभ केला. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून थांगराजा यांनी खास तयार केलेल्या स्कूटरवरून कन्याकुमारीहून लेह, इटानगर आणि कन्याकुमारी अशा मार्गाने त्यांची परिक्रमा सुरू केली आहे.गोव्याहून मंगळवारी (दि. १७) रात्री कोल्हापुरात आलेल्या थांगराजा यांनी बुधवारी पुण्याकडे प्रयाण केले. तेथून ते मुंबईकडे जाणार आहेत. कोल्हापुरात ‘प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड’चे अंध कार्यकर्ते सतीश नवले, कोल्हापूर केंद्राचे संचालक अरुण जनार्दन कुलकर्णी, ज्ञानसंवर्धन प्रकाशनचे ज्ञानराज भेलोंडे यांनी त्यांचे स्वागत केले.कन्याकुमारी येथील इझुस्सातूपट्टू येथे २१ जून १९८१ रोजी जन्मलेल्या थांगराजा यांनी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले असून २००८ पासून ते कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात कार्यरत आहेत. या शिलास्मारकाच्या उभारणीमध्येही त्यांनी त्यांच्या आईसह योगदान दिले आहे. पोलिओमुळे लहानपणापासून त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.यापूर्वी केलेल्या परिक्रमा१. कन्याकुमारी ते चेन्नई द्वारा रामेश्वरम, पुडुचेरी (१९ दिवसांत ११०० किलोमीटर, १९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०१३)२. कोलकाता ते कन्याकुमारी, द्वारा ओरिसा-आंध्र प्रदेश (५२ दिवसांत २८०० किलोमीटर, २२ जुलै ते ११ सप्टेंबर २०१३)३. टिमटाला (अमरावती) ते कन्याकुमारी, द्वारा हैदराबाद, बंगलोर (१३ दिवसांत २८०० किलोमीटर, ७ ते १९ नोव्हेंबर २०१४)४. भगिनी निवेदिता जन्मशताब्दी वर्षानिमित्त कन्याकुमारी ते दार्जिलिंग, द्वारा नागपूर, कोलकाता (२३ दिवसांत ४५०० किलोमीटर, २३ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर २०१७)

 

 

टॅग्स :Divyangदिव्यांगkolhapurकोल्हापूर