जातपडताळणीसाठी जिल्हानिहाय समित्या लवकरच : मोघे
By Admin | Updated: June 27, 2014 01:12 IST2014-06-27T01:09:54+5:302014-06-27T01:12:54+5:30
कोल्हापूर : जिल्हास्तरीय जातपडताळणी समिती स्थापन करण्याबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली आहे.

जातपडताळणीसाठी जिल्हानिहाय समित्या लवकरच : मोघे
कोल्हापूर : जिल्हास्तरीय जातपडताळणी समिती स्थापन करण्याबाबत शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली आहे. तिचा अहवाल महिन्याभरात देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर या समित्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
सामाजिक न्यायविभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांचे वितरण येथे झाले. त्यासाठी येथे आलेल्या मोघे यांची नंतर पत्रकारपरिषद झाली. ते म्हणाले,‘आता राज्यात १५ विभागीय जातपडताळणी समित्या आहेत. त्या समित्यांनी गेल्या अकरा महिन्यांत ११ लाख ४९ हजार जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली आहेत. आॅनलाईन सेवा व सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे हे काम सुलभ झाले आहे. परंतु लोकांचा त्रास कमी करण्यासाठी जिल्हानिहाय समित्या स्थापन करण्याची मागणी होती. पूर्वी अशा समितीचे महसूल अधिकारी अध्यक्ष होते. आमच्या विभागाकडे स्टाफ कमी आहे. त्यामुळे त्या स्थापन करण्यात अडचणी आहेत.
यासंबंधीचा अभ्यास करण्यासाठीच पाच-सहा दिवसापूर्वीच समिती नियुक्त केली आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. रमाई घरकुल योजनेतून सामाजिक न्याय विभागाने २०१० पासून आतापर्यंत सव्वादोन लाख घरे मागासवर्गीय व नवबौध्द समाजाला दिली असल्याचे सांगून मोघे म्हणाले, ‘या योजनेचा आता अठरा जिल्ह्यांत एकही लाभार्थी शिल्लक नाही. (प्रतिनिधी)