राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

By Admin | Updated: July 23, 2014 00:05 IST2014-07-22T23:47:11+5:302014-07-23T00:05:09+5:30

संगमनेर येथे होणार रस्सीखेच स्पर्धा :

District team for state tournament announced | राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघ जाहीर

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघटनेच्यावतीने संगमनेर (जि. अहमदनगर) येथे दि. २६ ते २८ जुलै अखेर महिलांच्या १६व्या राज्य रस्सीखेच स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघासाठी १७ वर्षांखालील किशोर गट व १९ वर्षांखालील कुमार गटांची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेला मुलींचा संघ असा : १७ वर्षांखालील गटात : सलोनी आरेकर, हर्षदा कचरे, फरीन शेख (सर्व इचलकरंजी), विद्या दळवी, हर्षदा मगदूम, प्रियंका माणगावे, धनश्री पाटील (सर्व कवठेसार), निशिगंधा बाटुंगे (म्हाळुंगे), निशिगंधा यादव, पूजा पाटील (अतिग्रे).
१९ वर्षांखालील गटात : सोनल सावंत, सिद्धी शिंदे, आसावरी ढेंगे, कस्तुरी बेडगी (सर्व दिंडनेर्ली), किरण पाटील (ठिकपूर्ली), उत्कर्षा ढेंगे, पूजा पाटील, काजल महाडिक, भारती भालेराव, सेजल डावरे, प्रतीक्षा जाबशेट्टी (सर्व गारगोटी), स्नेहा किणीकर (कवठेसार), आदिक्षा आलमान (अतिग्रे).
शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील, सचिव तृप्ती खत्री, उपाध्यक्ष विवेक हिरेमठ, पांडुरंग पाटील व प्रशिक्षक रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवड करण्यात आल्या.

Web Title: District team for state tournament announced