जिल्हा सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

By Admin | Updated: March 29, 2015 00:23 IST2015-03-29T00:23:11+5:302015-03-29T00:23:11+5:30

शनिवारी बिनविरोध निवडीची घोषणा

District Sutagiri election uncontested | जिल्हा सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

जिल्हा सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

जयसिंगपूर : यड्राव (ता. शिरोळ) येथील कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शनिवारी बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली सूतगिरणीचे अध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) यांच्या प्रयत्नाने सूतगिरणीला मिळत असलेल्या गतवैभवामुळे सभासदांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूरचे सुनील शिरपूरकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था, करवीरचे पी. एम. मालगावे यांनी काम पाहिले.
संचालक मंडळ असे : राजेंद्र शामराव पाटील (यड्रावकर), संजय शामगोंडा पाटील (यड्रावकर), आदिनाथ गणपती आरबाळे, मधुकर रामचंद्र जगताप, धनपाल दादू आलासे, वसंतराव बाबासोा नाईक, प्रकाश महादेव सुलतानपुरे, राजगोंडा शंकर पाटील, आप्पासोा धनपाल बडबडे, प्रकाश सागर लठ्ठे, आप्पा भाऊ चौगुले, प्रकाश भूपाल अकिवाटे, राजू किसन आवळे, बाळासाहेब बाबगोंडा पाटील, राजेंद्र जयपाल झेले, पद्मश्री अजित
खंजिरे, शशिकला रामगोंडा पाटील. (प्रतिनिधी)

Web Title: District Sutagiri election uncontested