जिल्हा सराफ संघातर्फे सव्वा लाखांची औषधे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:52+5:302021-04-27T04:24:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीमती जंबुवती ओसवाल यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर ...

जिल्हा सराफ संघातर्फे सव्वा लाखांची औषधे भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनानुसार श्रीमती जंबुवती ओसवाल यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर जिल्हा सराफ संघ व कॅस्प्रो ग्रुप ऑफ कंपनी यांच्याकडून सव्वा लाखाची औषधे दिली.
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी श्रीमती जंबुवती ओसवाल यांच्या स्मरणार्थ ही मदत देण्यात आली. ही औषधे कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिली. पॅरासिटेमॉल गोळ्या १५००, व्हिटॅमिन २०००, ऑक्सिजन मास्क १३७, एक्झामिनेशन ग्लोव्हज २००० नगर, बिकॉसूल झेड २००० नग, झिंक सल्फेट ३८२० इत्यादी औषधांचा त्यात समावेश आहे. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे, सराफ संघाचे संचालक जितेंद्र राठोड, अशोक झाड, संजय चोडणकर, रेसिडन्सी क्लबचे सचिव अमर गांधी, बाळासाहेब खाडे उपस्थित होते.
इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांनी सुध्दा महापालिका कोविड सेंटरसाठी औषधे दिली. यावेळी सचिव गीतांजली ठोमके, सहसचिव मनीषा जाधव उपस्थित होते.