शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षपदाने आवाडेंना विधानसभेला उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:50 IST

अतुल आंबी । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी झालेली निवड ही ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी झालेली निवड ही आवाडे कुटुंबीयांसह गटाला उभारी देणारी ठरली आहे. या निवडीमुळे नवे-जुने सर्व कार्यकर्ते व प्रमुख नेते ‘रिचार्ज’ झाले असून, त्यांच्यात उत्साह पाहावयास मिळत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर मिळालेल्या या पदामुळे आवाडे गटाची पक्षावरील नाराजीही दूर झाली आहे.जिल्ह्यातील कॉँग्रेसमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे मोलाचे योगदान आहे. कॉँग्रेस पक्षाला जनमानसांत रूजविण्यापासून पक्षाशी एकनिष्ठपणाने राहत दोन्ही पिढ्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांना अपयश आले. त्यापाठोपाठ जिल्हाध्यक्ष निवडणुकीत कल्लाप्पाण्णा आवाडे यांना अपयश आले. सर्वच निवडणुकांमध्ये लागोपाठ अपयश आल्याने आवाडेंची पीछेहाट झाली. त्यामुळे आवाडेंसह गटाची मोठी हानी झाली. या परिस्थितीत अतिशय संयमाने हालचाली करत ँप्रकाश आवाडे यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. अंतर्गत गटबाजीचा फटका आवाडे यांना बसत होता. त्यामुळे सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी आवाडेंनी राहुल आवाडे यांना आपल्या पूर्वाश्रमीच्या मतदारसंघातून उमेदवारी मागितली. ठरल्यासारखे पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे आवाडे यांनी ताराराणी पक्षाची स्थापना करून पक्षाला ताकद दाखविण्याच्या हेतूने बंड करून स्वबळावर निवडणूक लढवली आणि त्यात विजयही मिळविला. संपूर्ण जुना आवाडे गट सक्रिय करून मिळविलेले हे यश आवाडेंच्या पथ्यावर पडले.पुन्हा राजकीय समीकरणे बदलत गेली. आवाडेंनी आता आपली वाटचाल गतिमान केली. प्रमुख संस्था असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅँक, जवाहर साखर कारखाना याठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. त्यातून नॅशनल शुगर फेडरेशन नवी दिल्लीचे संचालक पद व राज्य साखर संघाच्या संचालकपदी रूजू झाले. विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून जनतेशी व कार्यकर्त्यांशी जोडून राहणे. जुन्या चुका भरून काढणे, यावर भर देण्याचे काम प्रकाश आवाडे यांनी सुरू केले. जिल्हा परिषदेतील सत्तेत सहभाग घेतला.जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे अपरिहार्य बनले. त्यासाठी मनोमिलन व्हावे म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही हालचाली झाल्या. त्याचीच संधी साधत जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होऊन आवाडे यांनी वरिष्ठांना आपल्या कौशल्याची खात्री पटवून दिल्याने त्यातून जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली.सन २०१२ मध्ये हुकले होते पदमाजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी २०१२ मध्ये माजी आमदार संजय घाटगे यांच्याविरोधात जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक लढवली. त्यात घाटगे विजयी झाले. मात्र, निवडणुकीनंतर आवाडे समर्थकांना मारहाण करण्यात आली. जिल्हा कॉँग्रेसच्या राजकारणात घडलेल्या या प्रसंगाची राज्यस्तरावरील नेत्यांनी गंभीर दखल घेत घाटगे यांच्या निवडीला स्थगिती दिली आणि सन २०१४ मध्ये अध्यक्षपदाची माळ पी. एन. पाटील यांच्या गळ्यात पडली होती.निवडीचा होणार फायदाचया निवडीमुळे प्रकाश आवाडेंना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फायदा होणार आहे. अंतर्गत गटबाजी संपुष्टात आल्यामुळे आवाडे-आवळे, आवाडे-पी.एन. पाटील असे मनोमिलन झाले आहे. या मनोमिलनामुळे सर्व गटांची ताकद एकवटली जाऊन त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे.