जिल्हा पोलीस प्रमुखांची मुरगूड पोलीस स्थानकाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:54+5:302021-09-26T04:26:54+5:30

किरीट सोमय्या दौरा मुरगूड : किरीट सोमय्या हे मंगळवारी मुरगूड पोलीस स्थानक आणि संताजी घोरपडे कारखान्याला भेट देणार ...

District Police Chief visits Murgud Police Station | जिल्हा पोलीस प्रमुखांची मुरगूड पोलीस स्थानकाला भेट

जिल्हा पोलीस प्रमुखांची मुरगूड पोलीस स्थानकाला भेट

किरीट सोमय्या दौरा

मुरगूड : किरीट सोमय्या हे मंगळवारी मुरगूड पोलीस स्थानक आणि संताजी घोरपडे कारखान्याला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मुरगूड पोलीस स्थानक आणि संताजी घोरपडे कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. सोमय्या यांना कोणत्या मार्गानी आणायचे तसेच मुरगूड आणि कारखाना याठिकाणी बंदोबस्त कसा असेल, याबाबत युद्धपातळीवर नियोजन सुरू आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस प्रमुख तिरुपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील यांनी प्रथम संताजी घोरपडे साखर कारखान्याला बाहेरून भेट देत परिसराची पाहणी केली. दरम्यान, शनिवारी दिवसभर शहरातील राष्ट्रवादीसह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी बोलावून शांततेबाबत सूचना व मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पोलीस स्थानकामध्ये बैठक पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी मुश्रीफांनी सोमय्या यांना येऊ द्या, पाहणी करू द्या, असे सांगितले आहे. त्यामुळे आपण कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल, असे वर्तन करू नका, असे सांगत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना आपणही प्रशासनाला सहकार्य करावे. काळे झेंडे लावून त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय आपण मागे घ्यावा, अशी विनंती केली.

दरम्यान, सोमवारपासून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन असल्याचे समजते. साधारणत: मुरगूडमध्ये दोनशे ते अडीचशे आणि तितकेच कारखाना स्थळावर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

Web Title: District Police Chief visits Murgud Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.