वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीची आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:25 IST2021-01-23T04:25:19+5:302021-01-23T04:25:19+5:30
कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन या आपत्तीनंतर तब्बल एक वर्षांनी जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी (दि. २३) ...

वर्षानंतर जिल्हा नियोजन समितीची आज सभा
कोल्हापूर : कोरोना, लॉकडाऊन या आपत्तीनंतर तब्बल एक वर्षांनी जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवारी (दि. २३) दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात होत आहे. यावेळी आगामी २०२१-२२ या सालासाठीच्या आराखड्यावर चर्चा व चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील असतील.
जिल्हा नियोजनची सभा २४ जानेवारी २०२०ला झाली होती. त्यानंतर मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. पुढचा सगळा कालावधी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांवर खर्ची पडला. आता जनजीवन पूर्वपदावर आल्याने जिल्हा नियोजनची बैठक होत आहे. यंदा कोरोनामुळे राज्य शासनाने विकासकामांसाठीच्या निधीत कपात केली होती. मात्र नंतर कोल्हापूरला पूर्ण ३३० कोटींचा निधी आला आहे. ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने ४३३ ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता सुरू असल्याने विकासकामे करता आली नाहीत. या सगळ्याचा आणि चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. त्याशिवाय २०२१-२२ या नवीन वर्षासाठीच्या आराखड्यावर चर्चा केली जाणार आहे.
--