जि. प. उपाध्यक्ष खोत यांच्यासह चौघांवर गुन्हा

By Admin | Updated: February 20, 2015 00:15 IST2015-02-20T00:15:14+5:302015-02-20T00:15:29+5:30

दुबार ठराव प्रकरण : गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यासमोर दिवसभर तणाव

District Par. Vice President Khot and four others | जि. प. उपाध्यक्ष खोत यांच्यासह चौघांवर गुन्हा

जि. प. उपाध्यक्ष खोत यांच्यासह चौघांवर गुन्हा

कणेरी : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील सुंदराबाई चव्हाण सहकारी दूध संस्थेच्या दुबार ठराव प्रकरणावरुन काल झालेल्या हाणामारीप्रकरणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत शामराव खोत यांच्यासह चारजणांवर अपहरण करून कोंडून ठेवणे व त्यासाठी सरकारी वाहनांचा व इमारतीचा वापर करणे असे गुन्हे गोकुळ शिरगाव पोलिसांत नोंद झाले आहेत. याबाबतची फिर्याद संस्थेचे विद्यमान संचालक हिंदुराव तुकाराम जाधव (वय ५२, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली.याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार कणेरीवाडी येथील सुंदराबाई चव्हाण दूध संस्थेच्या दुबार ठरावाची सुनावणी बुधवारी (दि. १८) सहायक निबंधक कार्यालय येथे होती. सुनावणीदरम्यान कणेरीवाडीतील सुरेश मोरे व शशिकांत खोत गट समोरासमोर भिडले होते.


पोलीस ठाण्याबाहेर प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न
हा प्रकार पोलीस ठाण्याच्या बाहेरच मिटावा यासाठी महाडिक व सतेज पाटील गटांचे वरिष्ठ पातळीवरूनही प्रयत्न सुरू होते. पण, रात्री नऊ वाजता सुरेश मोरे गटाच्या तक्रारीवरून शशिकांत खोत यांच्यासह अरुण महादेव मोरे (वय २०), पांडुरंग कृष्णात खोत (वय ५२) व राजाराम शंकर कदम (सर्व रा. कणेरीवाडी, ता. करवीर) यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

Web Title: District Par. Vice President Khot and four others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.