जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST2020-12-22T04:22:36+5:302020-12-22T04:22:36+5:30

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने १५ ते ३५ वयोगटांतील युवक-युवतींसाठी ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात ...

District Level Youth Festival Online | जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन

जिल्हास्तरीय युवा महोत्सव ऑनलाईन

कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने १५ ते ३५ वयोगटांतील युवक-युवतींसाठी ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी सोमवारी दिली.

यामध्ये लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (इंग्रजी, हिंदी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ), सितार वादन, बासरी वादन, तबला वादन, विणा वादन, मृदूंग, हार्मोनियम (लाईट), गिटार, मनिपुरी नृत्य, ऒडिसी नृत्य, भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्य यांच्या स्पर्धा होतील. विजयी होणारे स्पर्धक विभागस्तर युवा महोत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धा जिल्हा-विभाग-राज्य-राष्ट्रीय या पद्धतीने होतील. अधिक माहिती dsokop.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी बुधवारी (दि. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

----

इंदुमती गणेश

Web Title: District Level Youth Festival Online