शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

बर्कीच्या वन समितीस जिल्हास्तरीय वनग्राम पुरस्कार

By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST

५१ हजारांचे पहिले बक्षीस : अंबपवाडी, कारिवडेचाही सन्मान

कोल्हापूर : बर्की (ता. शाहूवाडी) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीस संत तुकाराम वनग्राम जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय पुरस्कार अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीस जाहीर झाला असून, ही समिती ३१ हजार रुपये बक्षिसाची मानकरी ठरली. अकरा हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार कारिवडे (ता. भुदरगड) येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यातून सन २०१४-१५ मध्ये पुरस्कारासाठी एकूण नऊ समित्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांंच्याअध्यक्षतेखाली संत तुकाराम वनग्राम पुरस्कार जिल्हा निवड समितीने; सहभागी समित्यांच्या कामांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट तीन समित्यांची निवड केली. राज्य शासनाने लोकसहभागातून वन व्यवस्थापन ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार कोल्हापूर वनविभागात ४४६ संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाल्याचे वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले. वनांचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमण, वनवणवा, अवैध चराई, आदींना प्रतिबंध करणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडे वर्ग केलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेमध्ये वनांच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणे हे समितीचे काम आहे. या समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून दरवर्र्षी उकृष्ट काम करणाऱ्या पहिल्या तीन समित्यांना जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे रोख स्वरूपात पुरस्कार बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.