कोल्हापूर जिल्ह्यात ‘लवकर या’च्या गजरात बाप्पांना निरोप--
By Admin | Updated: September 10, 2014 00:29 IST2014-09-10T00:10:13+5:302014-09-10T00:29:07+5:30
डॉल्बी, झांज, बेंजोचा निनाद, ढोल-ताशांच्या कडकडाटांवर ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

कोल्हापूर जिल्ह्यात ‘लवकर या’च्या गजरात बाप्पांना निरोप--
भावपूर्ण वातावरणात जिल्ह्यात गणेशमूर्तींचे विसर्जन : डॉल्बीसह झांजपथक, बेंजोचा निनाद, ढोल-ताशांचा कडकडाट
कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात डॉल्बी, झांज, बेंजोचा निनाद, ढोल-ताशांच्या कडकडाटांवर ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात जिल्ह्यात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी सुरू झालेल्या मिरवणुका मंगळवारी सकाळीपर्यंत सुरू होत्या. पाऊस असूनही गणेशभक्तांनी बाप्पांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
इचलकरंजी : इचलकरंजीत तब्बल २२ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत युवती आणि महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सुमारे ५३७ गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. सकाळी दहा वाजता शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयापासून मानाच्या बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचा प्रारंभ गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मदन कारंडे, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, उद्योगपती नितीन धूत यांच्यासह माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.विसर्जन मिरवणुकीवेळी काही मंडळांच्या महिलांनी भगवे फेटे परिधान करून मराठी बाणा जपल्याचे दिसत होते. कबनूरचा मानाचा गणेश या मंडळाची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्धरीतीने काढली होती. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मंडळाकडून सर्वच भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. तसेच राजीव गांधी विद्यामंदिरच्या मिरवणुकीमध्ये व्यसनमुक्तीवर आधारित नाटक बसविण्यात आले होते. गतवेळच्या मिरवणुकीचा अनुभव लक्षात घेता यावेळी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. विसर्जन मार्गावर विविध चौदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सहा टेहळणी पथके कार्यरत होती. वाद्यांच्या आवाजाची तीव्रता आणि मद्यप्राशन केलेल्यांच्या तपासणीसाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. नदीघाटावर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपालिका तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावतीने क्रेनची सुविधा उपलब्ध केली होती. (प्रतिनिधी)
यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत बहुतांशी मंडळांनी लहान-मोठ्या डॉल्बी लावल्या. आवाजाची मर्यादा तपासणारे यंत्र पोलिसांकडे होते. मात्र, आज, मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही मंडळांवर अथवा डॉल्बीवर कारवाई करण्यात आल्याची नोंद पोलिसांत नव्हती. दरम्यान, यावर्षीही मुख्य मिरवणूक मार्गावर विविध पक्ष व संघटनांच्या किमान डझनभर स्वागत कमानी उभारल्या गेल्या होत्या. या विविध स्वागत कक्षांचे उद्घाटन गृहराज्यमंत्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राधानगरीत दहा तास मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत चंदगडला मिरवणुका
गारगोटीत ३२ मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन
कसबा बावड्यात जल्लोषात निरोप
कागलमध्ये डॉल्बीला फाटा /////आजऱ्यात मनोरंजनाचे कार्यक्रम ठरले आकर्षण
जयसिंगपूर, शिरोळमध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन////////////गडहिंग्लजमध्ये १९ तास मिरवणुका
मलकापुरात पहाटेपर्यंत मिरवणुका
मलकापूर : मलकापूर परिसरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. गणेश मंडळांच्या मिरवणुका पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होत्या. यावर्षी गणेश मंडळांनी डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला होता.
काल, सोमवारी दुपारी दोन वाजता सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. मिरवणुकीसमोर बेंजो-बँड पथक, पारंपरिक ढोल-ताशा होता. काही मंडळांनी लाईट इफेक्टचा वापर केला होता. डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती, तरीदेखील गणेशभक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता. पहाटे चार वाजेपर्यंत मिरवणुका सुरू होत्या.