अब्दुललाटमधील कोविड केअर केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST2021-05-28T04:19:12+5:302021-05-28T04:19:12+5:30

अब्दुललाट : येथे लोकसहभाग आणि देणगीतून साकारलेल्या कोविड केअर केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी भेट दिली. ...

District Health Officer visits Kovid Care Center in Abdullat | अब्दुललाटमधील कोविड केअर केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

अब्दुललाटमधील कोविड केअर केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट

अब्दुललाट : येथे लोकसहभाग आणि देणगीतून साकारलेल्या कोविड केअर केंद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी भेट दिली. त्यांनी रुग्णांशी संवाद साधून ग्रामपंचायत व ग्राम समितीचे कौतुक केले. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे बारा लाख रुपये जमवून केंद्र उभे केले. केंद्रामध्ये साठ रुग्ण उपचार घेत असून, खासगी डॉक्टर विनामूल्य सेवा देत आहेत. आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीकडून रुग्णांच्या चहा-नाष्टा व भोजनाची व्यवस्था केली जात आहे. अशा लोकवर्गणीतून चालविलेल्या केंद्राला गुरुवारी साळे यांनी भेट दिली. यावेळी जि.प.सदस्य विजय भोजे, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, डॉ. भूषण यमाटे, डॉ. अरुण कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२७०५२०२१-आयसीएच-०२

अब्दुललाट (ता.शिरोळ) येथील कोविड केअर केंद्रास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी भेट दिली. यावेळी डॉ. अरुण कुलकर्णी, जि.प.सदस्य विजय भोजे, विद्याधर कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Web Title: District Health Officer visits Kovid Care Center in Abdullat