शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 19:20 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना महिनाभराच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. शासनाच्या यादीबाहेरील औषधे जादा दराने घेतल्याचा ठपका ठेवत सध्या या प्रकरणी अहवाल तयार करण्यात आला असून आता या अहवालावर पुढील कार्यवाही करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील सक्तीच्या रजेवरजादा दराने औषध खरेदी प्रशासन विभागाकडून अहवालाची छाननी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांना महिनाभराच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. शासनाच्या यादीबाहेरील औषधे जादा दराने घेतल्याचा ठपका ठेवत सध्या या प्रकरणी अहवाल तयार करण्यात आला असून आता या अहवालावर पुढील कार्यवाही करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.आरोग्य विभागाने गेल्या वर्षभरामध्ये ३ कोटी रुपयांची औषध खरेदी केली आहे. यामध्ये शासनाच्या यादीवरील ५६० औषधांव्यतिरिक्त अन्य कंपन्यांचीही काही औषधे खरेदी करण्यात आली आहे.

एकीकडे शासनमान्य यादीबाहेरील औषधे खरेदी करणाऱ्या आरोग्य विभागाने दुसरीकडे शासन कराराच्या काहीच याद्याच विचारात घेतल्या आहेत. अन्य याद्या विचारार्थ घेऊन जर औषध खरेदी केली असती तर जिल्हा परिषदेचे १६ लाख रुपये वाचले असते, असे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते.जानेवारीच्या अखेरीस याबाबत चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, वृत्तपत्रांनी आवाज उठविल्यानंतर पुन्हा तातडीने याबाबत कार्यवाही सुरू झाली. चौकशीचे कामही सखोलपणे झाले नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चौकशी अहवाल वित्त विभागाकडे सोपवून त्याची छाननी करण्याच्या सूचना केल्या.त्यानुसार दोन दिवसांत छाननी करून हा अहवाल सोमवारी रात्री डॉ. खेमनार यांच्याकडे देण्यात आला. यामध्ये प्रशासकीय आणि वित्तीय अशा दोन प्रकारांतील प्रक्रिया त्रुटी दाखविण्यात आल्या असून वित्तीय अनियमितता असल्याचे स्षष्ट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रशासन विभागाने सोमवारी दोन वरिष्ठांना या अहवालाची छाननी करण्याचे काम दिले असून त्यानुसार आता चौकशीच्या नोटिसा दोन दिवसांत काढल्या जातील.

सर्वसाधारण सभेतील उद्रेक टाळण्याचा प्रयत्नडॉ. प्रकाश पाटील यांची कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या विभागाबाबत अनेक तक्रारी होत्या. याबाबत त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी समजही दिली होती. मात्र, त्यांनी कोणत्याही सुधारणा केल्या नाहीत. या प्रकरणानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनी त्यांना कडक भाषेत सूचना केल्या. त्यानंतर मग डॉ. पाटील यांनी महिन्याची रजा टाकली. येत्या ९ मार्चला सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामध्ये फार उद्रेक होऊ नयेत असे प्रयत्न सुरू आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्य