शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:52 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत प्रशिक्षण सुरू आहे. या ठिकाणी टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधा केंद्रांमध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ निवडणूक कर्तव्यात असलेल्या कर्मचारी व पोलीस, होमगार्डस्नी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. २१) मतदानापर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदाननिवडणूक कर्मचाऱ्यांसह, पोलीस, होमगार्डस्चा समावेश

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत प्रशिक्षण सुरू आहे. या ठिकाणी टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधा केंद्रांमध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ निवडणूक कर्तव्यात असलेल्या कर्मचारी व पोलीस, होमगार्डस्नी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. २१) मतदानापर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंंघांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी नऊ वाजता मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक १, २ व ३ यांच्या पथकांसाठी गुरुवारीही प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, राजारामपुरी येथे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी, विवेकानंद कॉलेजमधील बापूजी साळुंखे स्मृतिभवन हॉल येथे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी, यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज येथे करवीर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व मतदारसंघांतील प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवडणूक कर्मचाºयांसाठी व पोलीस, होमगार्डस्साठी टपाली मतदानाकरिता ५२ मतदान केंद्रांची सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ मतदान कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीत टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधांमुळे मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.दरम्यान, निवडणूक विभागाकडून सीमेवरील सैनिकांसाठीही मतदानासाठी ८७५३ आॅनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यांवर मतदान होऊन त्या निवडणूक विभागाकडे यायला सुरुवात होणार आहे.झालेले टपाली मतदान असे (आतापर्यंत)विधानसभा मतदारसंघ       टपाली मतदान

  • चंदगड                                  ६४२
  • राधानगरी                             ८५३
  • कागल                                  ८२३
  • कोल्हापूर (दक्षिण)               ५७७
  • करवीर                                 ६१८
  • कोल्हापूर (उत्तर)                ३९३
  • शाहूवाडी                              ४०४
  • हातकणंगले                        ४६७
  • इचलकरंजी                         २७८
  • शिरोळ                                ५५३

मतदान साहित्याचे वाटपव्होटर्स स्लिप (मतदान चिठ्ठी)ची नोंद असणारी नोंदवही, मृत मतदारांची यादी, नावांच्या आद्याक्षरांप्रमाणे (अल्फाबेटिकल) मतदारांची यादी अशा साहित्याचे जिल्हा निवडणूक विभागातर्फे गुरुवारी सर्व विधानसभांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVotingमतदानkolhapurकोल्हापूर