शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जिल्हा शिक्षण संस्था संघा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:30 IST

सर्व अनुदानित शाळांना नियमितपण वेतनेत्तर अनुदान मिळावे, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंध त्वरीत लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगींच्या गजरात मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हयातील एक हजार शाळा बंद; मोर्चास उत्सफुर्ते प्रतिसाद

कोल्हापूर : सर्व अनुदानित शाळांना नियमितपण वेतनेत्तर अनुदान मिळावे, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंध त्वरीत लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगींच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे प्रलंबित मागण्याचे निवेदन संघातर्फे देण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासह शिक्षण भरती पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करण्यासाठी मंगळवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हयातील एक हजार शाळेचे संस्था चालक, शिक्षक, शिक्षककेत्तर कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठया संख्यने मोर्चात सहभागी झाले होते.

दसरा चौक येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत व्हीनस कॉर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख म्हणाले, शासन पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था विस्कळीत करत आहे. पवित्र पोर्टलमुळे शिक्षण संस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वांनी एकत्र लढा देणे आवश्यक आहे.

सचिव प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, शासनाने शिक्षक भरतीचे सर्व अधिकार संस्थाचालकांकडून काढून घेतल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेसमोर प्रश्नचिन्ह आहे.प्राचार्य क्रांतिकुमार पाटील म्हणाले, शाळामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने गुणवत्ता कशी राखायची,असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डी. बी. पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, कार्याध्यक्ष बापूसाहेब शिंदे, डॉ. अभयकुमार साळुंखे, शिक्षण सभापती अमरीश घाटगे, नावेद मुश्रीफ, भैय्या माने, विरेंद्र मंडलिक, व्ही. जी.पोवार,आर. वाय. पाटील,बी. जी. बोराडे, आर.डी. पाटील,एम. एन. पाटील, सुधाकर निर्मळे, संतोष आयरे, रघू पाटील, प्रदीप साळोखे, मिलिंद बारवडे, समीर घोरपडे, एन. आर. भोसले, अशोक हुबळे ,संदीप पाटील आदी उपस्थित होते.मागण्या अशा -- २० टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना पुढील अनुदानाचे पुढील टप्पे मिळावेत.- मूल्यांकन झालेल्या शाळांना त्वरित अनुदान द्यावे.- जुनी पेन्शन योजना सुरू करा.- बालवाडी शिक्षिका सेविकांना शासनाकडून वेतन मिळावे-बालवाडी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा.जिल्हयातील एक हजार शाळा बंदशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शिक्षक संघाने केलेल्या शाळा बंद आवाहनाला जिल्ह्यातील बहुतांश सर्वच शाळांनी शाळा बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा बंदमध्ये जवळपास १ हजार बंद ठेवण्यातआल्या. जिल्हयातील विविध ठिकाणाहून संस्थाचालक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे पाच हजार जण या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा संघातर्फे करण्यात आला.-------------------------खासदार महाडिकांचा पाठिंबाखासदार धनंजय महाडिक यांनीही आंदोलनास पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला आहे. या पत्रामध्ये महाडिक यांनी धनंजय महाडिक युवाशक्ती शिक्षण संस्थांच्या बाजूने असून याबाबत राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन महाडिक यांनी दिले आहे. हे पत्र संतोष आयरे यांनी आंदोलकांकडे सुपूर्द केले.

मुलांचे नुकसान होणार नाहीशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी एक दिवस शाळा जरी बंद ठेवल्या असले तरी, सुट्टीच्या दिवशी आज झालेले शैक्षणिक कामकाज सुट्टीच्या दिवशी भरून काढण्यात येणार असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी याप्रसंगी सांगितले.कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस शाळा बंद ठेवून हा मोर्चा काढण्यात आला. शाळा बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेला शाळांचा परिसरात अशी शुकशुकाट होती.
कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे प्रलंबित मागण्यासह शिक्षण भरती पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मार्गदर्शन करताना प्रा. जयंत आसगावकर

 

टॅग्स :Teacherशिक्षकStrikeसंप