महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:16+5:302021-09-21T04:27:16+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता करुन वृक्षारोपण ...

महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता करुन वृक्षारोपण केले.
महानगरपालिकेतर्फे विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी व महापालिका कर्मचारी यांच्यातर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येते त्यानुसार रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जन असल्याने इराणी खण परिसर, तांबट कमान, पंचगंगा घाट परिसर, मैल खड्डा, राजाराम तलाव व सार्वजनिक गणेश विसर्जन होणारी ठिकाणी सहायक आयुक्त संदीप घार्गे व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या व्यवस्थापनांतर्गत स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
या मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून स्वच्छता मोहिमेला शुभेच्छा दिल्या. यावेळी महालक्ष्मी मंदिर येथील घाटी दरवाजा येथील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास स्वच्छता दूत अमित देशपांडे व नागेश देसाई यांच्या तर्फे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या मोहिमेत विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, दिलीप पाटणकर, महेश भोसले, शुभांगी पोवार, महापालिका कर्मचारी, सामाजिक संस्था व नागरिक उपस्थित होते.
फोटो क्रमांक - २००९२०२१-कोल-स्वच्छता मोहिम
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत रविवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भाग घेऊन वृक्षारोपण केले.