चंदगडच्या ऑक्सिजन प्लांट जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:54+5:302021-05-19T04:24:54+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी चंदगड ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालय ...

चंदगडच्या ऑक्सिजन प्लांट जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी चंदगड ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
ग्रामीण रुग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी जागेची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई यांनी कोरोना आढावा घेताना उपलब्ध बेडची माहिती घेतली. रुग्णांची काळजी घेण्याची सूचना करून ऑक्सिजन उपलब्ध करून इर्मजन्सीसाठी कोटा शिल्लक ठेवण्यास सांगितले.
चंदगड ग्रामीण रुग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी जागेची पाहणी केली. कानूर व स्टिफन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू असलेल्या कोविड सेंटरची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. खोत, डॉ. एस. एस. साने, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, अभियंता संजय सासणे आदी उपस्थित होते.
-------------------
* फोटो ओळी : चंदगड ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटच्या जागेची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणावरे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : १८०५२०२१-गड-१२