जिल्हा बँकेची २७ सप्टेंबरला ऑनलाईन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST2021-08-28T04:29:04+5:302021-08-28T04:29:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबरला दुपारी एक ...

District Bank's online meeting on September 27 | जिल्हा बँकेची २७ सप्टेंबरला ऑनलाईन सभा

जिल्हा बँकेची २७ सप्टेंबरला ऑनलाईन सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबरला दुपारी एक वाजता घेण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हाेते.

कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्हा बँकेशी संलग्न सुमारे १२ हजार सहकारी संस्था सभासद आहेत. त्यामुळे बँकेने यंदा ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २७ सप्टेंबरला दुपारी एक वाजता जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील मुख्य कार्यालयातच ही सभा घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यावेळी संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने आदी उपस्थित होते.

Web Title: District Bank's online meeting on September 27