जिल्हा बँकेने दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:17 IST2021-07-04T04:17:58+5:302021-07-04T04:17:58+5:30
कोरोना महामारीच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग हा पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यांचे पशुधन अडचणीत आले आहे. खोचीसह परिसरातील सर्व ...

जिल्हा बँकेने दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे
कोरोना महामारीच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग हा पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यांचे पशुधन अडचणीत आले आहे. खोचीसह परिसरातील सर्व दूध उत्पादक हे या भागाचे दूध उत्पादकांचे नंदनवन असणाऱ्या वारणा दूध संघाला स्थानिक दूध संस्थांच्यामार्फत दूध पुरवठा करतात. सध्या ओला चारा, सुका चारा यांचा तुटवडा व पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे या दूध उत्पादक शेतकऱ्यांना वारणा दूध संघाने पशुधन व्यवसाय करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामार्फत बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा व शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे, अशी मागणी वडगाव बाजार समितीचे संचालक, खोचीचे माजी उपसरपंच एम. के. चव्हाण यांनी केली आहे.
वारणा दूध संघाने शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जपुरवठा केल्यावर वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील पशुधन वाढून दूध संघास दूध पुरवठा मुबलक होईल. त्यामुळे दूध संघालाही फायदा मिळेल व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून कोरोना महामारीच्या संकटातून दूध उत्पादक शेतकरी बाहेर पडेल. तरी वारणा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळवून द्यावे,अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.