गवळी समाजाकडून पोलिसांना शक्तिवर्धक काढा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:56+5:302021-06-04T04:18:56+5:30
जे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे पोलिस व कर्मचारी दिवस रात्र, ऊन पाऊस, वादळ वारे, झेलत. आपल्या ...

गवळी समाजाकडून पोलिसांना शक्तिवर्धक काढा वाटप
जे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे पोलिस व कर्मचारी दिवस रात्र, ऊन पाऊस, वादळ वारे, झेलत. आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून समाजाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत.
त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दूध, हळद, साखर, वेलची यांचा प्रतिकारशक्तीवर्धक काढा करून देण्यात आला. यापुढेही हा प्रतिकारशक्तीवर्धक काढा गवळी समाजामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त युवराज गवळी यांनी दिली.
याप्रसंगी गवळी समाजाचे विश्वस्त युवराज गवळी, कार्याध्यक्ष उदय डाकवे, उपकार्याध्यक्ष दिलीप गवळी, अमोल गवळी, वैभव चिले, सचिन महाडिक, राहुल चिले, सुजित गवळी, सामर्थ्य गवळी, बाळू गवळी, संतोष महाडिक, हेमंत चिले, देवेंद्र गवळी, महेश चौकीकर, पुष्पक चिले, गवळी समाज बांधव उपस्थित होते.
०३ पाचगाव गवळी समाज
फोटो ओळ : गवळी समाजाच्या वतीने आरकेनगर येथे बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्यवर्धक काढा देताना गवळी समाजाचे विश्वस्त युवराज गवळी, कार्याध्यक्ष उदय डाकवे, उपकार्याध्यक्ष दिलीप गवळी आदी.