आईवडिलांच्या पुण्यस्मरण दिनी शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:25 IST2021-09-19T04:25:03+5:302021-09-19T04:25:03+5:30
कागल : कै. निवृत्ती तुकाराम माळी व निळावती निवृत्ती माळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माळी कुुुटुंबीयांच्या वतीने कागल पाच ...

आईवडिलांच्या पुण्यस्मरण दिनी शालेय साहित्य वाटप
कागल : कै. निवृत्ती तुकाराम माळी व निळावती निवृत्ती माळी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माळी कुुुटुंबीयांच्या वतीने कागल पाच प्राथमिक शााळांना पुस्तके व शालेय साहित्यासाठी दहा हजार रुपयांचा निधी व करनूर येथील वृद्धाश्रमास अन्नधान्य वाटप करण्यात आले. गतवर्षी १८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी दाम्पत्याचे निधन झाले होते. फोटो पूजन आणि साहित्य वाटप कार्यक्रमास जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, जि. प. सदस्य युवराज पाटील, मनोज फराकटे, प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, रमेश माळी, सदाशिव पिष्टे, विकास पाटील, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, प्रवीण काळबर, पक्षप्रतोद नितीन दिंडे, संजय ठाणेकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, सागर माळी व माळी परिवारासह विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो कॅप्शन १८ कागल माळी परिवार
शालेय साहित्यासाठीचा निधी सुनील माने, संजय चितारी यांच्या हस्ते मुख्याध्यापिका अश्विनी आतवाडकर यांनी स्वीकारला. यावेळी सुनील माळी, आनंदा पसारे, प्रवीण काळबर, राहुल चौगले, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.