विवेकानंद जयंतीनिमित्त चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:45+5:302021-01-13T05:04:45+5:30

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद आश्रम, आध्यात्मिक केंद्राच्या वतीने मंगळवारी श्री स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी ...

Distribution of prizes to the winners of painting and oratory competitions on the occasion of Vivekananda Jayanti | विवेकानंद जयंतीनिमित्त चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

विवेकानंद जयंतीनिमित्त चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद आश्रम, आध्यात्मिक केंद्राच्या वतीने मंगळवारी श्री स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी केली. दिवसभर धार्मिक कार्यक्रमासह चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

साठमारी गल्लीतील श्री स्वामी विवेकानंद आध्यात्मिक केंद्राच्या वतीने गेले तीन दिवस जयंती उत्सव सुरू होता. मंगळवारी सकाळी संस्थेच्या सभागृहात फोटो पूजन, पाळणा व प्रसाद वाटप झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदराव पायमल, विश्वस्त चंद्रकांत देसाई, शिवाजी पोवार, किरण अतिग्रे, मनोहर साळुंखे, कृष्णात बोडके, विश्वास माने, अमर साळोखे, विकास पायमल, नरेंद्र पायमल, संदीप चौगुले, संभाजीराव मगदूम, आनंदराव पाटील तसेच शारदा भगिनी सदस्य व विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, संस्थेच्या सभागृहात घेतलेल्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना परितोषिक वितरण झाले. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित सुनील कुलकर्णी व प्रसन्न मालेकर यांचे व्याख्यान झाले.

फोटो नं. १२०१२०२१-कोल-विवेकानंद अश्रम

ओळ : श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त श्री स्वामी विवेकानंद आश्रम, आध्यात्मिक केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

Web Title: Distribution of prizes to the winners of painting and oratory competitions on the occasion of Vivekananda Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.