वितरण बातमी : साने गुरुजी जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:42+5:302020-12-30T04:30:42+5:30
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. साने गुरुजींच्या शिल्पाचे पूजन उपाध्यक्ष प्रकाश आमते यांच्या हस्ते झाले. यानिमित्त ...

वितरण बातमी : साने गुरुजी जयंती उत्साहात
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. साने गुरुजींच्या शिल्पाचे पूजन उपाध्यक्ष प्रकाश आमते यांच्या हस्ते झाले. यानिमित्त दहावी व बारावी, पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे संचालक पंडितराव व कांचनमाला पोवार या दाम्पत्याच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार संजय मोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी विलास कवडे, श्रीकृष्ण लोखंडे, जितेंद्र मोरे, विश्वासराव जुवेकर, प्रकाश राऊळ, विलासराव सूर्यवंशी, धनंजय रोटे, बाबासाहेब पाटील, प्रतिभा देशमुख, प्रकाश कुलकर्णी, सचिव रमेश चौगुले आदी उपस्थित होते.
फोटो : २८१२२०२०-कोल-सानेगुरुजी
आेळी : सानेगुरुजी वसाहतीतील सानेगुरुजी शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने सानेगुरुजी यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.