पेरणोलीत गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:06+5:302021-06-09T04:30:06+5:30
पेरणोली (ता. आजरा) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे दलित, आदिवासी, श्रमिक, कष्टकरी, अल्पसंख्यांक ...

पेरणोलीत गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेरणोली (ता. आजरा) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे दलित, आदिवासी, श्रमिक, कष्टकरी, अल्पसंख्यांक जात वर्गातून आलेल्या असंघटित कामगार स्त्री-पुरुषांवर उपासमारीची वेळ आली. अशावेळी कोरो इंडिया या मुंबई येथील स्वयंसेवी संस्थेने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या कठीण काळात आधार देण्याचा निर्णय घेतला.
यावेळी कॉ. संपत देसाई यांनी माहिती दिली. आजरा तालुक्यातील अशा गरजू लोकांची माहिती देसाई यांनी दिल्यानंतर आज तालुक्यातील १०० लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
तालुका पंचायत समितीचे सभापती पवार व आजरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी भांगे यांच्याहस्ते झाले. तांदूळ, तेल, डाळ, साखर यांसह प्रत्येकी २ हजार किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे एक किट असे साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजी देसाई, रणजित कालेकर, कृष्णा सावंत, राजाराम देसाई, नामदेव कुकडे, निवृत्ती फगरे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.