राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या धनादेशांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:05+5:302021-07-14T04:28:05+5:30
जयसिंगपूर : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील शिरोळ तालुक्यातून दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या धनादेशांचे वाटप
जयसिंगपूर : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील शिरोळ तालुक्यातून दाखल झालेल्या प्रस्तावांपैकी पात्र ३० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजारप्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते हे धनादेश संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आले.
केंद्राने पुरस्कृत केलेल्या या योजनेसाठी राज्य शासनाकडून दारिद्र्य रेषेखालील परिवारातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा परिवाराला आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपयाची मदत राज्य शासनाकडून केली जाते. शासनाच्या यासारख्या अनेक योजना तळागळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. सर्वसामान्यांना या योजनांची माहिती मिळावी यासाठी तालुका प्रशासनाने प्रचार व प्रसार करावा, अशा सूचना मंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी संजय गांधी योजना समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, तहसीलदार अपर्णा मोरे, सुभाषसिंग रजपूत, धन्यकुमार सिदनाळे, केशव राऊत, रमेश शिंदे, कविता चौगुले, महादेव कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १२०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.