पुण्याच्या स्टेला मेरी कॉन्व्हेंट स्कूलतर्फे १०० पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:58+5:302021-08-21T04:28:58+5:30
वडगाव शेरी (पुणे) येथील स्टेला मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी आजरा तालुक्यातील गवसे परिसरातील १०० पूरग्रस्त कुटुंबांना प्रापंचिक ...

पुण्याच्या स्टेला मेरी कॉन्व्हेंट स्कूलतर्फे १०० पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्याचे वाटप
वडगाव शेरी (पुणे) येथील स्टेला मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी आजरा तालुक्यातील गवसे परिसरातील १०० पूरग्रस्त कुटुंबांना प्रापंचिक साहित्याचे वाटप केले. साहित्याच्या किटमध्ये तांदूळ, गहू, डाळी, साखर व तेल असे २० किलो ग्रॅमचे साहित्य देऊन या शाळेने माणुसकी जपली आहे.
कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्या सिस्टर आरकाज फर्नांडिस यांनी स्टाफ व विद्यार्थ्यांसमोर पूरग्रस्तांना मदत करण्याचा विषय मांडला. या सामाजिक कार्याला सर्वांनी लगेचच होकार दिला. स्टाफने वर्गणी तर विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशांतून मदत केली असल्याचे प्राचार्य अरकाज फर्नांडिस यांनी सांगितले. प्रापंचिक साहित्य गवसे, धनगरमोळा, दाभिल, पारपोली येथील पूरग्रस्तांना देण्यात आले. यावेळी आजरा पॅरीसचे फादर फिलिक्स लोबो, ब्रदर रेमंड व पॉली हे उपस्थित होते.
पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्य पोहोचविणे व लाभार्थी निवड मोतीराम बारदेस्कर, सिरीयल कुतिन्हो, जॉर्जी कुतिन्हो, जॉकी कुतिन्हो, बिलसेंट कुतिन्हो, मायकेल बारदेस्कर, बेजमा फर्नांडिस, काजमिल फर्नांडिस यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव मायकेल फर्नांडिस यांनी केले.
फोटो ओळी : पुण्यातील स्टेलामेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गवसे परिसरातील पूरग्रस्तांना प्रापंचिक साहित्याचे वाटप करताना आरकाज फर्नांडिस, फिलिक्स लोबो, मायकेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.
क्रमांक : २००८२०२१-गड-०८