हसूर दुमाला येथे वैद्यकीय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:26+5:302021-07-21T04:18:26+5:30
भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील खराडे यांनी राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य कार्यक्रमांना फाटा देऊन विविध ठिकाणी सामाजिक ...

हसूर दुमाला येथे वैद्यकीय साहित्य वाटप
भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील खराडे यांनी राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अन्य कार्यक्रमांना फाटा देऊन विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविल्याचे सांगितले.
कुरुकली कोविड केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित पाटील यांनी सहाशे रुग्णांना कोरोनामुक्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. हसूर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य मनोहर भाट यांच्याकडे प्रा. खराडे यांनी प्रदान केले. यावेळी बाळासाहेब खराडे, कुंडलिक पाटील, रामचंद्र पाटील, रघुनाथ पोवार,पांडुरंग कुंभार उपस्थित होते.
फोटो : हसूर दुमाला येथे राजेश पाटील सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय साहित्य प्रदान करताना भोगावतीचे संचालक प्रा. सुनील खराडे, मनोहर भाट, डॉ. रोहित पाटील व मान्यवर.