अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST2021-05-21T04:24:29+5:302021-05-21T04:24:29+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राला थंड, गरम आणि नॉर्मल शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वॉटर डिस्पेन्सर मशीन, नागरिकांना बसण्यासाठी पाच बाकडी, लस घेतल्यानंतर ...

Distribution of materials to Adkur Primary Health Center | अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य वाटप

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्रास साहित्य वाटप

प्राथमिक आरोग्य केंद्राला थंड, गरम आणि नॉर्मल शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वॉटर डिस्पेन्सर मशीन, नागरिकांना बसण्यासाठी पाच बाकडी, लस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या पॅरॉसिटॅमॉलच्या पाच हजार गोळ्या देण्यात आल्या.

याप्रसंगी सर्व साहित्य प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश दळवी यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी ग्राहक संरक्षण परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष संग्राम देसाई-अडकूरकर, शिवराज देसाई, संदीप आर्दाळकर, मनोज परीट, संदीप देसाई, अभिजित देसाई, सुभाण्णा गुरव, सुरेंद्र आर्दाळकर, दिलीप भेकणे आदी उपस्थित होते.

-------------------------

फोटो ओळी : अडकूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय मदत देताना संग्राम देसाई, शिवराज देसाई, अभिजित देसाई, सुभाण्णा गुरव, दिलीप भेकणे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २००५२०२१-गड-०२

Web Title: Distribution of materials to Adkur Primary Health Center