कोगनोळीत काँग्रेसप्रणीत संस्थांच्यावतीने मास्कचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST2021-06-05T04:17:31+5:302021-06-05T04:17:31+5:30

गावातील १० वॉर्डांतील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांकडे त्या वॉर्डातील नागरिकांसाठीचे मास्क देण्यात आले. या वेळी कोरोनाबरोबरच काळ्या, पांढर्‍या व पिवळ्या ...

Distribution of masks on behalf of Congress-affiliated organizations in Koganoli | कोगनोळीत काँग्रेसप्रणीत संस्थांच्यावतीने मास्कचे वितरण

कोगनोळीत काँग्रेसप्रणीत संस्थांच्यावतीने मास्कचे वितरण

गावातील १० वॉर्डांतील प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांकडे त्या वॉर्डातील नागरिकांसाठीचे मास्क देण्यात आले. या वेळी कोरोनाबरोबरच काळ्या, पांढर्‍या व पिवळ्या अशा प्रकारच्या बुरशीजन्य आजारांचीही लक्षणे दिसू लागली आहेत. या सर्व गोष्टींना न घाबरता त्यावर औषधोपचार करून घ्यावेत. तसेच या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कुटुंब व परिसरामध्ये स्वच्छता राखणे ही महत्त्वाचे आहे, असे वीरकुमार पाटील म्हणाले.

या वेळी शरद पाटील, पंकज पाटील, बाळू पाटील, मारुती कोळेकर यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई खोत, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, अनिल चौगुले, सचिन खोत, जगन्नाथ खोत, अनिल कोंडेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Distribution of masks on behalf of Congress-affiliated organizations in Koganoli