समृद्धी फौंडेशनमार्फत पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST2021-05-16T04:23:57+5:302021-05-16T04:23:57+5:30
वारणानगर : बहिरेवाडी येथील समृद्धी फौंडेशनने नेहमी सामाजिक बांधीलकी जपली असून सामाजिक क्षेत्रातील समृद्धी फौंडेशनचे कार्य प्रेरणादायी आहे, असे ...

समृद्धी फौंडेशनमार्फत पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
वारणानगर : बहिरेवाडी येथील समृद्धी फौंडेशनने नेहमी सामाजिक बांधीलकी जपली असून सामाजिक क्षेत्रातील समृद्धी फौंडेशनचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी येथे बोलताना केले.
बहिरेवाडी (ता. पन्हाळा) यांच्यावतीने मास्क व सॅनिटायझरच्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समृद्धी फौंडेशनचे अध्यक्ष विपुल खुपेरकर होते.
समृद्धी फौंडेशनच्या वतीने कोडोली पोलीस ठाणे, बहिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालय व पेठवडगाव पोलीस ठाणे येथे कोरोना प्रतिबंधक यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या पोलीस दलासह फ्रंटलाईन वर्कर्स यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, अध्यक्ष विपुल खुपेरकर, सरपंच शिरीषकुमार जाधव, पेठवडगाव पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, आदींच्या हस्ते झाले.
संस्थेचे सदस्य प्रसाद सराटे, कृष्णात पाटील उपस्थित होते.
फोटो ओळ- बहिरेवाडी येथील समृद्धी फौंडेशनमार्फत कोडोली पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप समृद्धी फौंडेशनचे अध्यक्ष विपुल खुपेरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, सदस्य प्रसाद सराटे, आदी मान्यवर उपस्थित होते.