सुदर्शन जीन्सच्या वतीने पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:09+5:302021-06-01T04:18:09+5:30

सुदर्शन जीन्स या कंपनीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांसाठी एक हजार N95 मास्क आणि पाचशे सॅनिटायझर ...

Distribution of masks and sanitizers to the police on behalf of Sudarshan Jeans | सुदर्शन जीन्सच्या वतीने पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

सुदर्शन जीन्सच्या वतीने पोलिसांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

सुदर्शन जीन्स या कंपनीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांसाठी एक हजार N95 मास्क आणि पाचशे सॅनिटायझर बॉटल्स आज येथे प्रदान करण्यात आल्या. कंपनीनेे कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हजारो मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केेेेले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे , गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कागल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, आर. आर. पाटील उपस्थितीत होते. सुदर्शन जीन्सचे सिद्धार्थ बन्सल यांच्या वतीने निहाल जमादार व सागर पिष्टे यांनी हे साहित्य प्रदान केले. कंपनीने महापुराच्या काळातही कागल परिसरातील अनेक गावांत संसारउपयोगी साहित्य दिले होते. चादरींचे वाटप केले होते. तर लाॅकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शेकडो कुटुंबांना धान्यवाटप केले आहे.

Web Title: Distribution of masks and sanitizers to the police on behalf of Sudarshan Jeans