यड्रावमध्ये दिव्यांगांना साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST2021-07-22T04:15:51+5:302021-07-22T04:15:51+5:30

दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने नांदणी येथे दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये साहित्यासाठी गरजू ...

Distribution of literature to the disabled in Yadrav | यड्रावमध्ये दिव्यांगांना साहित्याचे वाटप

यड्रावमध्ये दिव्यांगांना साहित्याचे वाटप

दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या वतीने नांदणी येथे दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये साहित्यासाठी गरजू लाभार्थी निवडण्यात आले. त्यांना टप्प्याटप्प्याने साहित्य वाटप करण्यात आले. या शिबिरांतर्गत लाभार्थ्यांना व्हीलचेअर, तीनचाकी, सायकल, कानयंत्र यासह साहित्य वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आला.

याप्रसंगी सरपंच कुणालसिंह नाईक-निंबाळकर, बाबासाहेब राजमाने, प्रदीप पाटील, मंगल कांबळे, सारंग काकडे, दत्ता कोळी, रोहित कदम, आनंदराव साने, विजयानंद माने, ग्रामविकास अधिकारी व्ही. व्ही. गावडे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

फोटो - २१०७२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळी-यड्राव (ता. शिरोळ) येथे दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, बाबासाहेब राजमाने, दत्ता कोळी, रमेश माने, रोहित कदम, व्ही. व्ही. गावडे उपस्थित होते.

Web Title: Distribution of literature to the disabled in Yadrav