नेसरीत पोलिसांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:39+5:302021-04-27T04:23:39+5:30

सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात सर्व पोलीस व होमगार्ड यांना डॉ. सत्यजित देसाई, इंजिनिअर प्रसाद करमळकर, ...

Distribution of homeopathic medicines to the police in Nesari | नेसरीत पोलिसांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप

नेसरीत पोलिसांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप

सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात सर्व पोलीस व होमगार्ड यांना डॉ. सत्यजित देसाई, इंजिनिअर प्रसाद करमळकर, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील व रवींद्र हिडदुगी यांच्या हस्ते या औषधांची किट्स वितरित करण्यात आली.

नेसरी पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. देसाई यांनी सध्याची कोरोना परिस्थिती, घ्यावयाचा आहार, तसेच कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी विशद करत साधी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी अविनाश माने व पत्रकार रवींद्र हिडदुगी यांनी मनोगतात डॉ. देसाई यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. स्वागत सहाय्यक फौजदार शिवाजीराव पाटील यांनी केले. आभार संजय जाधव यांनी मानले. यावेळी राजू पत्ताडे, पांडुरंग निकम यांच्यासह पोलीस स्टाफ व होमगार्ड उपस्थित होते.

Web Title: Distribution of homeopathic medicines to the police in Nesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.