कुरुंदवाडमध्ये दिव्यांगांना अनुदान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:06+5:302021-02-05T07:01:06+5:30

पालिकेच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान धनादेश वाटपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष पाटील बोलत होते. पालिकेने आवाहन केल्याप्रमाणे १५६ दिव्यांग ...

Distribution of grants to the disabled in Kurundwad | कुरुंदवाडमध्ये दिव्यांगांना अनुदान वाटप

कुरुंदवाडमध्ये दिव्यांगांना अनुदान वाटप

पालिकेच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान धनादेश वाटपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष पाटील बोलत होते. पालिकेने आवाहन केल्याप्रमाणे १५६ दिव्यांग लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांना ५ लाख ४६ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामध्ये ४० ते ६० टक्क्यांपर्यंतच्या ८१ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार ८०० रुपये, ६१ ते ८० टक्क्यांपर्यंतच्या ३१ लाभार्थ्यांना ३ हजार ७०० रुपये, ८१ ते १०० टक्क्यांपर्यंत ४४ लाभार्थ्यांना प्रत्येकी ४ हजार ७०० रुपये याप्रमाणे अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक दीपक गायकवाड, फारुख जमादार, सुरेश बिंदगे, शशिकांत तोबरे आदी उपस्थित होते.

फोटो - ३१०१२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे दिव्यांगांना पालिकेच्या वतीने अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दीपक गायकवाड, फारुख जमादार, सुरेश बिंदगे उपस्थित होते.

Web Title: Distribution of grants to the disabled in Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.