पनोरी येथे जनवन विकास योजनेतून गॅस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:17 IST2021-07-16T04:17:54+5:302021-07-16T04:17:54+5:30

पनोरी (ता.राधानगरी) येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत शासनाच्या वन विभागामार्फत जंगल तोड कमी करुन जंगलाचे संवर्धन करणे, ...

Distribution of gas from Janvan Vikas Yojana at Panori | पनोरी येथे जनवन विकास योजनेतून गॅस वाटप

पनोरी येथे जनवन विकास योजनेतून गॅस वाटप

पनोरी (ता.राधानगरी) येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत शासनाच्या वन विभागामार्फत जंगल तोड कमी करुन जंगलाचे संवर्धन करणे, वन्य प्राणी व मानव यांच्यामधील संघर्ष कमी करणे या उद्देशाने गावातील ९५ गरजू कुटुंबांना एल.पी.जी.गॅस कनेक्शनचे वितरण आमदार प्रकाश आबिटकर यांचे हस्ते व महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी योजना विभागीय वनाधिकारी विशाल माळी म्हणाले, ही योजना प्रभावी व पारदर्शकपणे राबविणेकरिता गावातून स्वतंत्र वनविकास कमिटी स्थापन करुन या योजनेचा लाभ घ्यावा.

यावेळी वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, वनपाल संजय कांबळे,

दतात्रय केसरे, कुंडलिक पताडे,

सूर्यकांत गुरव,सरपंच तुकाराम परीट,उपसरपंच स्वप्निल पातले, शशिकांत कांबळे,रणजित चौगले,अजित देसाई,मोहन बरगे,संजय सूर्यवंशी,विश्वास चौगले,संभाजी परीट,वसंत चौगले, विजय बरगे,प्रशांत शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेवक सुरेश परीट यांनी मानले.

१५ पनोरी गॅस वाटप

फोटो ओळ-

पनोरी ता.राधानगरी येथे जन-वनविकास योजनेतून गॅस कनेक्शन वाटप करताना आ.प्रकाश आबिटकर, नंदकिशोर सूर्यवंशी, विशाल माळी, तुकाराम परीट व इतर मान्यवर.

Web Title: Distribution of gas from Janvan Vikas Yojana at Panori