पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित फळे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:20+5:302021-09-18T04:26:20+5:30

सावरवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त गणेशवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यानिकेतनच्या विद्यार्थांना करवीर तालुका भाजपच्यावतीने ...

Distribution of fruits on the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित फळे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित फळे वाटप

सावरवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त गणेशवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी विद्यानिकेतनच्या विद्यार्थांना करवीर तालुका भाजपच्यावतीने शुक्रवारी फळे वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात माजी सैनिक भिकाजी जाधव, दिलीप खाडे, सुभाष पाटील, शिवाजी बुवा, अजितसिंह चव्हाण, संभाजी पाटील, एसबी देवणे, रमेश खाडे आदी मान्यवरांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. यावेळी भिकाजी जाधव, शिवाजी बुवा, संभाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव यादव यांनी केले. ज्ञानदेव यादव यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of fruits on the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.