वडगाव पोलिसांच्या वतीने मिशन संवेदनांर्गत अन्नधान्य किट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:32+5:302021-05-31T04:18:32+5:30

पेठवडगाव : मिशन संवेदनांर्गत वडगाव व हद्दीतील २०० कष्टकरी, मजुरांना लोकसहभागातून अन्नधान्यांचे किट पोलीस ...

Distribution of food kits under Mission Sensation on behalf of Wadgaon Police | वडगाव पोलिसांच्या वतीने मिशन संवेदनांर्गत अन्नधान्य किट वाटप

वडगाव पोलिसांच्या वतीने मिशन संवेदनांर्गत अन्नधान्य किट वाटप

पेठवडगाव : मिशन संवेदनांर्गत वडगाव व हद्दीतील २०० कष्टकरी, मजुरांना लोकसहभागातून अन्नधान्यांचे किट पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी वाटप केले.

वडगाव पोलिसांनी सामाजिक उपक्रम राबवत महिन्याचा किराणा गरजूंना दिला आहे. यासाठी लोकसहभागातून २०० किट उपलब्ध केली होती. यामध्ये तांदूळ, आटा, साखर, तूरडाळ, चहापूड, खाद्यतेल, हळद, जिरे, तीळ, चटणी यांचा समावेश होता. वडगाव परिसरातील हातावर पोट असलेल्या मजूर, रस्त्यांच्या कामावर असलेले कामगार, कष्टकरी कारागीर यांना मदतीचा हात देत आधार दिला.

३० वडगाव पोलीस

फोटो कॅप्शन:

पेठवडगाव : वडगाव पोलिसांच्या वतीने मिशन संवेदनांर्गत २०० अन्नधान्य किट वाटप करताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे छाया : संतोष माळवदे

Web Title: Distribution of food kits under Mission Sensation on behalf of Wadgaon Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.