उत्तूरमध्ये कुटुंब कल्याण धनादेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:07+5:302021-07-19T04:16:07+5:30
उत्तूर (ता. आजरा) येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेंतर्गत धनादेश वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. ...

उत्तूरमध्ये कुटुंब कल्याण धनादेशाचे वितरण
उत्तूर (ता. आजरा) येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेंतर्गत धनादेश वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाले. प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
अनिता कुरळे, छाया गुरव, पार्वती सावंत यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, तलाठी सोनवणे, संजय गांधी निराधार योजनेचे अधिकारी, बारापत्रे, वसंत धुरे, पं.स. सदस्य शिरीष देसाई, विजय गुरव, विठ्ठल उत्तूरकर, सुधीर सावंत आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेंतर्गत कुटुंबांना धनादेश वाटप करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. शेजारी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, वसंत धुरे, शिरीष देसाई आदी उपस्थित होते.
क्रमांक : १८०७२०२१-गड-०१