शेवाळे येथील रुग्णांना काढ्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST2021-06-30T04:16:50+5:302021-06-30T04:16:50+5:30

या घटनेत गावातील इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित आल्याने एक प्रकारे भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना ...

Distribution of extract to patients at Shewale | शेवाळे येथील रुग्णांना काढ्याचे वाटप

शेवाळे येथील रुग्णांना काढ्याचे वाटप

या घटनेत गावातील इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित आल्याने एक प्रकारे भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना मनोधैर्य देण्याचे काम चंदगडचे सामाजिक कार्यकर्ते सुनील काणेकर यांच्यासह दीपक वडेर, बाबू शेडगे, स्वप्निल पाटील यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील काणेकर यांनी शेवाळे येथील प्राथमिक शाळेतील रुग्णांची भेट घेवून मनोधैर्य वाढावे यासाठी वेदविद्या शिकवून त्यांना आयुर्वेदिक काढा दिला.

कोरोनाकाळात काणेकर यांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांचे प्रबोधन करून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत आहेत. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रुग्णांना कोरोना केंद्रावर जाऊन स्वत: काढ्याचे ते वाटप करत आहेत. त्याअंतर्गतच त्यांनी शेवाळे गावातील या रुग्णांचे प्रबोधन करून त्यांची भीती घालवून त्यांना धीर दिला.

फोटो ओळी : शेवाळे (ता. चंदगड) येथील कोरोनाबाधित रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनील काणेकर. शेजारी दीपक वडेर, बाबू शेडगे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २९०६२०२१-गड-१०

Web Title: Distribution of extract to patients at Shewale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.