तृतीय पंथीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:32+5:302021-06-06T04:17:32+5:30

कोल्हापूर : काेरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या मंगळवार पेठेतील ३० तृतीय पंथीयांना शुक्रवारी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ...

Distribution of essential materials to third parties | तृतीय पंथीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

तृतीय पंथीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

कोल्हापूर : काेरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या मंगळवार पेठेतील ३० तृतीय पंथीयांना शुक्रवारी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नांदेड, बारामती, कराड येथील नागरिकांनी मदतीचा हात दिला.

कोरोनाची दुसरी लाट एप्रिलमध्ये सुरू झाल्यापासून तृतीय पंथीयांनादेखील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. समाजापासून उपेक्षित असलेल्या या घटकांना मदत मिळावी यासाठी शुभांगी थोरात व डॉ. प्रिया दंडगे यांनी समाज माध्यमाद्वारे आवाहन केले होते. या आवाहनाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. या मदतीतून मंगळवार पेठेतील रेणुका मंदिर येथे तीस तृतीपंथीयांना पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले. यापूर्वी असेच आवाहन करून जमा झालेली मदत शहरातील वारांगनांना देण्यात आली होती.

--

फोटो नं ०५०६२०२१-काेल-तृतीयपंथी मदत

ओळ : लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या तृतीय पंथीयांसाठी नागरिकांच्या सहकार्यातून जमा झालेल्या रकमेतून शुभांगी थोरात व डॉ. प्रिया दंडगे यांनी जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.

Web Title: Distribution of essential materials to third parties