विरळे येथील भीमनगरात जीवनावश्यक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:19+5:302021-06-01T04:18:19+5:30

विरळेपैकी भीमनगरामध्ये ३५ कुटुंबांची बौद्धवस्ती आहे. या वस्तीमध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचे २५ रुग्ण आढळून आल्यामुळे हा विभाग प्रतिबंधित ...

Distribution of essential materials in Bhimnagar at Virle | विरळे येथील भीमनगरात जीवनावश्यक साहित्याचे वाटप

विरळे येथील भीमनगरात जीवनावश्यक साहित्याचे वाटप

विरळेपैकी भीमनगरामध्ये ३५ कुटुंबांची बौद्धवस्ती आहे. या वस्तीमध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचे २५ रुग्ण आढळून आल्यामुळे हा विभाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यांना मदत व्हावी या हेतूने बौद्ध महासभेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, सुरेश कांबळे, सागर कांबळे, रमेश कांबळे, दिलीप कांबळे, संदीप कांबळे, शांताराम कांबळे, संजय कांबळे, दीपक कांबळे, दीपाली कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Distribution of essential materials in Bhimnagar at Virle