वाकरेत पांडुरंग पतसंस्थेच्यावतीने इलेक्ट्रिक बाईकचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:18+5:302021-08-27T04:27:18+5:30
कोपार्डे : प्रदूषणविरहित ई-बाईकचे पांडुरंग सहकारी पतसंस्थेने कर्ज पुरवठा करून खातेदारांना आर्थिक सहकार्य केलेच आहे, त्याप्रमाणे निसर्ग रक्षणासाठीदेखील ...

वाकरेत पांडुरंग पतसंस्थेच्यावतीने इलेक्ट्रिक बाईकचे वाटप
कोपार्डे : प्रदूषणविरहित ई-बाईकचे पांडुरंग सहकारी पतसंस्थेने कर्ज पुरवठा करून खातेदारांना आर्थिक सहकार्य केलेच आहे, त्याप्रमाणे निसर्ग रक्षणासाठीदेखील मदत केली असल्याचे अध्यक्ष हिंदूराव देवरे-पाटील यांनी सांगितले.
वाकरे (ता. करवीर) येथील पांडुरंग सहकारी पतसंस्थेच्यावतीने १५ खातेदारांना इलेक्ट्रिक मोटारसायकलचे वाटप अध्यक्ष हिंदूराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नामदेव चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंदूराव पाटील म्हणाले, अवसायनात गेलेल्या पतसंस्था ताब्यात घेऊन गेल्या दहा वर्षांत संस्थेच्या आर्थिक प्रगतीची घोडदौड राखली आहे. पतसंस्थेतील सभासद, खातेदार म्हणून शेतकरी, शेतमजूर व नोकरदार यांची संख्या मोठी आहे. दररोज दोन ते अडीच लाख पिग्मी संकलन होत असून, १० कोटींच्या ठेवी आहेत. शून्य टक्के एनपीए असून, राष्ट्रीयीकृत बँकेत मिळणाऱ्या सर्व सुविधा संस्थेकडून देण्यात येत आहेत. संस्थेची स्वमालकीची इमारत असून, संपूर्णपणे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे.
यावेळी संचालक नामदेव माने, बाबू शिंदे, मारुती बिरंजे, शिवाजी तोडकर व बिग गॉस इलेक्ट्रिक स्कूटरचे वितरक अमित पाटील उपस्थित होते. सचिव जयवंत पाटील यांनी आभार मानले.
260821\20210826_151515.jpg
फोटो
वाकरे ता. करवीर येथील पांडुरंग पतसंस्थेच्या वतीने इलेक्ट्रिक मोटरसायकल चे वितरण करतांना अध्यक्ष हिंदूराव पाटील उपाध्यक्ष नामदेव चौगले,बाबू शिंदे,मारुती बिरंजे,शिवाजी तोडकर