जन-वनविकास योजनेतून पनोरी येथे सिलिंडरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:16 IST2021-07-01T04:16:38+5:302021-07-01T04:16:38+5:30
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत शासनाच्या वन विभागामार्फत जंगल तोड कमी करून जंगलाचे संवर्धन करणे, वन्य प्राणी व ...

जन-वनविकास योजनेतून पनोरी येथे सिलिंडरचे वाटप
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत शासनाच्या वन विभागामार्फत जंगल तोड कमी करून जंगलाचे संवर्धन करणे, वन्य प्राणी व मानव यांचेमधील संघर्ष कमी करणे या उद्देशाने गावातील ९५ गरजू कुटुंबांना एल.पी.जी. गॅस कनेक्शनचे वितरण आमदार प्रकाश आबिटकर यांचे शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना योजना विभागीय वनाधिकारी विशाल माळी म्हणाले सदरची योजना प्रभावी व पारदर्शकपणे राबविण्याकरीता गावातून स्वतंत्र वनविकास कमिटी स्थापन करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच गावच्या सर्वांगीण विकास साधणेसाठी भविष्यात विविध प्रकारच्या धोरणात्मक योजना वनखात्याकडून राबविणेत येणार आहेत.
यावेळी वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे, वनपाल संजय कांबळे, दतात्रय केसरे, कुंडलिक पताडे, सूर्यकांत गुरव, सरपंच तुकाराम परीट, उपसरपंच स्वप्निल पातले, शशिकांत कांबळे, रणजित चौगले, अजित देसाई, मोहन बरगे, संजय सूर्यवंशी, विश्वास चौगले, संभाजी परीट, वसंत चौगले, विजय बरगे, प्रशांत शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेवक सुरेश परीट यांनी मानले.